राज्यात दोन शहराचे नामतरण या नावे ओळखली जाणार | Gazzate Maharashtra 2023

Aurangabad & Osmanabad Renaming : – 

नमस्कार मित्रांनो ,राज्यात दोन शहराचे नांव बदल करून मिळावे अशी मागणी येथील नागरिक करीत होते ,त्यामध्ये  या शहराचं समावेश आहे औरंगाबाद आणि उस्मानाबाद , औरंगाबाद शहराचं नामकरण “छत्रपती संभाजीनगर “आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण “धाराशीव “करण्याची मागणी होत होती .संबंधित दोन्ही शहराचं नामकरण बाबत राज्य सरकार मंजूरी दिल्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला होता.दिनांक २४/०२/२०२३ रोजी या दोन्ही शहराचे नांव बदलण्याच्या प्रस्तावला मंजूरी दिली आहे .(gazette certificate)

Chatrapati Sambhaji Nagar &  Dharashiv :

महाराष्ट्र सरकार ने दिलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकार असे निर्णय दिले की ,औरंगाबाद या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर ”

असे  करण्याच्या प्रस्तावास गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राप्त . केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे  या पुढे “औरंगाबाद”,

तालुका व जिल्हा औरंगाबाद ,महाराष्ट राज्य या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” तालुका व जिल्हा औरंगाबाद असे करण्यात आले

अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे . (gazette certificate)

 

Maharashtra Govemment Gazette Download : 

उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून ते “धाराशीव “असे करण्याच्या प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकार कडे २० ऑक्टोबर २०२२ रोजी पाठविले होते .संबधित प्रस्तावा वर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूरी देण्यात आले त्यानुसार आता उस्मानाबाद ,तालुका व जिल्हा उस्मानाबाद ,महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते “धाराशिव”असे करण्यात आले त्यानुसार पुढील सर्व कार्यवाही होणार असे सामान्य प्रशासन विभागानेजारी केलं आहे . osmanabad renaming 2023

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top